इंग्लंडच्या जोश हलला तिसऱ्या कसोटीत स्थान
06:39 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ लंडन
Advertisement
20 वर्षीय जोश हल या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची इंग्लंडने लंकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी संघात निवडले आहे. त्याची ही पदार्पणाची कसोटी असेल.
इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून मॅथ्यू पॉट्सच्या जागी जोश हलला स्थान मिळाले आहे. हलने गेल्या वर्षीच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी अतिशय प्रभावी कामगिरीमुळे निवड समितीने त्याची दुसऱ्या कसोटीआधीच जखमी मार्क वूडच्या जागी निवड केली होती. पण तिसऱ्या कसोटीत त्याला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे.
Advertisement
या कसोटीसाठी निवडलेला इंग्लंड संघ : डॅन लॉरेन्स, बेन डकेट, ओली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, ओली स्टोन, जोश हल, शोएब बशिर.
Advertisement