इंग्लंडच्या हॅरी केनला ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार
मागील 25 वर्षांतील पुरस्कार प्राप्त होणारा पहिला इंग्लिश खेळाडू
वृत्तसंस्था, लंडन : गेल्या हंगामात नोंदविलेल्या दमदार गोलसंख्येच्या जोरावर हॅरी केन मागील 25 वर्षांत बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकणारा पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. केनने गेल्या हंगामात क्लब आणि राष्ट्रीय संघासाठी एकूण 73 गोल केले. तो युरोपमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.
जर्मनीमध्ये बायर्न म्युनिकसाठी खेळताना त्याने गोल करण्याचे अनेक विक्रम मोडीत काढले, तर विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्व करताना संघाला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवले. या पुरस्कारानंतर आपल्या कारकिर्दीच्या सुऊवातीच्या काळातील संघर्षाची आठवण काढत 33 वर्षीय केनने तऊण खेळाडूंसाठी एक भावनिक संदेश दिला. कठोर परिश्रम केल्यास काहीही शक्य आहे. जेव्हा कोणीही पाहत नसते, तेव्हाही मेहनत करणे, चढ-उतारांतून जाणे, जिद्द, दृढनिश्चय आणि स्वत:वर विश्वास ठेवून शिकत राहणे महत्त्वाचे असते, असे त्याने त्यात म्हटले आहे.
केनच्या नेतृत्वाखाली बायर्न म्युनिकने बुंडेसलिगा आणि जर्मन कप जिंकण्याची दुहेरी कामगिरी केली. जर्मन कपच्या अंतिम सामन्यात त्याने स्टुटगार्टविऊद्ध हॅट्ट्रिकही नोंदवली. बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. विश्वचषकात केनने सहा गोल केले आणि गॅरी लिनेकरला मागे टाकत तो विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. तसेच विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या पाच जणांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला.
उपांत्य फेरीत इंग्लंडचा संघ अर्जेंटनाकडून पराभूत झाला, परंतु तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात त्यांनी एम्बाप्पेच्या फ्रान्सला पराभूत केले. गेल्या 60 वर्षांतील विश्वचषकातील इंग्लंडची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 2001 मध्ये मायकल ओवेनला प्राप्त झालेल्या पुरस्कारानंतर बॅलोन डी’ओर पटकावणारा केन हा पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे. हा सोहळा ‘लंडन पॅलेडियम’ येथे आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे, स्पेनची स्टार खेळाडू अॅलेक्सिया पुटेलास हिने महिलांचा बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला. तिने हा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त करून विक्रमाशी बरोबरी केली आहे.
