महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिवसात 600 धावा करण्याची इंग्लंडची क्षमता : पोप

06:38 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्यातील एका दिवसाच्या खेळामध्ये 600 धावा जमविण्याचा विक्रम इंग्लंडचा संघ करेल. तशी क्षमता आपल्या संघात असल्याचे प्रतिपादन इंग्लंडचा फलंदाज ऑली पोपने केले आहे.

Advertisement

1936 साली मँचेस्टर येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 6 बाद 588 धावा जमवित विक्रम नोंदविला होता.     इंग्लंडने कसोटी क्रिकेटमध्ये नोंदविलेला हा विक्रम मागे टाकून दिवसभराच्या खेळात 600 धावा जमविण्याचा नवा विश्वविक्रम इंग्लंडचा संघ करु शकेल, असे भाकित पॉपने केले आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील सध्याच्या इंग्लंड संघामध्ये ही क्षमता निश्चितच आहे, असेही तो म्हणाला. सध्याच्या  कालावधीत दिवसभराच्या खेळत आम्ही 280 ते 300 धावा करु शकतो. पण भविष्याकाळत 600 धावांपर्यंत मजल मारली जाईल, असेही पॉपने म्हटले आहे. 2022 च्या डिसेंबरमध्ये रावळपिंडीत झालेल्या पाक विरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडने 506 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याची आठवण पॉपने करुन दिली आहे.

सध्या विंडीज विरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने विंडीजचा डावाने पराभव केला. तर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने विंडीजवर 241 धावांनी विजय मिळवला आहे. आता उभय संघातील तिसरी आणि कसोटी येत्या शुक्रवारपासून एजबेस्टन येथे सुरू होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article