For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड महिला संघ जाहीर

06:04 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड महिला संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, लंडन

Advertisement

इंग्लंड आणि वेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी यजमान इंग्लंड महिला संघाची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. या स्पर्धेसाठी इंग्लंडचे नेतृत्व नॅट सिव्हर ब्रंटकडे सोपविण्यात आले आहे.

अनुभवी नॅट सिव्हर ब्रंटने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 7 वेळा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. या स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या इंग्लंड महिला संघामध्ये 18 वर्षीय फिरकी गोलंदाज टिली कॉर्टीन कोलमन तसेच इसी वाँग आणि लॉरेन फिलेर हे नवे चेहरे राहतील. इंग्लंड महिला संघातील आणखी एक अनुभवी खेळाडू डॅनी वॅट-हॉज हिने आपले स्थान कायम राखले असून तिची ही आठवी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे. अष्टपैलू चार्ली डुनकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. इंग्लंडच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने वेगवान गोलंदाज लॉरेन बेलवर राहील. 2009 साली आयसीसीची महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंड संघातील तत्कालीन कर्णधार चार्लोट एडवर्ड्स ही सध्या इंग्लंड संघाची प्रमुख प्रशिक्षिका आहे. सदर स्पर्धा इंग्लंडमध्ये होत असल्याने साहजिकच त्यांना इतर संघांच्या तुलनेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी स्थानिक शौकिनांकडून अधिक प्रोत्साहन मिळेल. इंग्लंडचा संघ यावेळी पुन्हा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

Advertisement

इंग्लंड महिला संघ: नॅट सिव्हर ब्रंट (कर्णधार), चार्ली डीन (उपकर्णधार), लॉरेन बेल, अॅलिस कॅप्से, टिली कॉर्टीन-कोलमन, सोफिया डंक्ले, सोफी इक्लेस्टोन, लॉरेन फिलेर, डॅनी गिब्सन, अॅमी जोन्स, फ्रेया केम्प, हीदर नाईट, लिन्से स्मिथ, इसी वाँग, डॅनी वॅट-हॉज.

Advertisement
Tags :

.