For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंग्लंड महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी

06:22 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंग्लंड महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी
Advertisement

पाकचा 37 धावांनी पराभव, सोफी इक्लेस्टोन सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ डर्बी

सध्या पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघाने पाकवर 37 धावांनी विजयी मिळवित 1-0 अशी आघाडी मिळविली. या सामन्यात इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकात 9 बाद 243 धावा जमवल्या. त्यानंतर पाकने 50 षटकात 9 बाद 206 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.

इंग्लंड संघामध्ये अॅलिस कॅप्सेने 65 चेंडूत 3 चौकारासह 44, अॅमी जोन्सने 38 चेंडूत 3 चौकारासह 37, ब्यूमाँटने 40 चेंडूत 5 चौकारासह 33, कर्णधार नाईटने 49 चेंडूत 2 चौकारासह 29, नॅट सिव्हर ब्रंटने 34 चेंडूत 4 चौकारासह 31 धावा जमवल्या. क्लेरी डीनने 2 चौकारासह 20 आणि सारा ग्लेनने नाबाद 16 धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या डावामध्ये 22 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडने पहिल्या पॉवर प्लेमधील 10 षटकात 52 धावा जमवताना 1 गडी गमवला. पाकतर्फे निदा दारने 56 धावात 3 तर नशरा संधू, युमी हनी, अलिया रियाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये मुनिबा अलीने 60 चेंडूत 1 चौकारासह 34, सलामीच्या सदाफ शमासने 48 चेंडूत 3 चौकारासह 28, कर्णधार निदा दारने 38 चेंडूत 3 चौकारासह 26, अलिया रियाजने 32 चेंडूत 3 चौकारासह 21, नजिता अल्वीने 1 चौकारासह नाबाद 26 धावा केल्या. पाकच्या डावामध्ये 16 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडच्या गोलंदाजांना शिस्तबद्ध गोलंदाजी करता आल्याने पाकला 40 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 31 वाईड चेंडूंचा समावेश आहे. इंग्लंडतर्फे सोफी इक्लेस्टोनने 26 धावात 3, केटी क्रॉसने 46 धावात 2, लॉरेन डेलने 42 धावात 2 तर क्लेरी डीनने 39 धावात 2 गडी बाद केले. पाकने पहिल्या पॉवर प्ले मधील 10 षटकात 47 धावात जमवताना एक गडी गमवला. तर तिसऱ्या आणि शेवटच्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी 41 धावा जमवताना एक गडी गमवला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकात 9 बाद 243 (ब्यूमाँट 33, नाईट 29, नॅट सिव्हर ब्रंट 31, कॅप्से 44, जोन्स 37, डीन 20, ग्लेन नाबाद 16, अवांतर 8, निदा दार 3-56, संधू, युमी हनी आणि अलिया रियाज प्रत्येकी 2 बळी), पाक 50 षटकात 9 बाद 206 (शमास 28, मुनिबा अली 34, निदा दार 26, अलिया रियाज 21, नजीया अल्वी नाबाद 26, अवांतर 40, इक्लेस्टोन 3-26, क्रॉस 2-46, बेल 2-42, डीन 2-39).

Advertisement
Tags :

.