इंग्लंड संघाचे लक्ष मालिका विजयावर
वृत्तसंस्था, लंडन
लॉर्ड्स मैदानावर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडचा समावेश पुन्हा पाकवर मोठा विजय मिळवून मालिका हस्तगत करण्यासाठी सज्ज झाला आहे. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने हेडिंग्लेचा पहिला सामना केवळ 1053 चेंडूत जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक माऱ्याच्या जोरावर पाकचा एक डाव आणि 103 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली होती. हा सामना एकतर्फी झाला. या सामन्यात इंग्लंडचे रॉबिनसन आणि टंग हे वेगवान गोलंदाज पाकचे कर्दनकाळ ठरले होते. तसेच हॅरी ब्रुकने शानदार अर्धशतक झळकविले होते. अनुभवी रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने ही कसोटी केवळ दोन दिवसांत जिंकण्याचा पराक्रम केला होता.
सलमान आगाच्या नेतृत्वाखाली पाकचा संघ लॉर्ड्सच्या कसोटीत दर्जेदार कामगिरी करून या मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. 2024 च्या डिसेंबरनंतर इंग्लंडचा क्रिकेट संघ मालिका विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 2024 साली न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाकने कसोटी मालिका जिंकली होती. अॅटकिनसन, आर्चर, रॉबिनसन व टंग यांच्यावर इंग्लंड संघाच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त राहील. लॉर्ड्सच्या कसोटीत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा राहील. त्यामुळे वेगवान गोलंदाजीस अनकुल असलेल्या खेळपट्टीवर पाकच्या वेगवान गोलंदाजांची इंग्लंडच्या भक्कम फलंदाजीवर सत्वपरीक्षा ठरेल.