कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या कसोटीतही इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर

06:29 AM Dec 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अॅशेस मालिका, पिंक बॉल कसोटी : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 511 धावा : दुसऱ्या डावात इंग्लिश संघाची घसरगुंडी

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

Advertisement

अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. ब्रिस्बेनमध्ये शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 511 धावा केल्या. दुसऱ्या डावात खेळताना इंग्लिश फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दुसऱ्या डावात 134 धावांत 6 गडी गमावले होते. संघ अजूनही 43 धावांनी मागे आहे आणि 2 दिवसांचा खेळ बाकी आहे.

द गाबा स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने 6 बाद 378 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मायकेल नेसरच्या रुपाने ऑसी संघाने सातवी विकेट गमावली. तो 16 धावा करून बाद झाला. यानंतर अॅलेक्स कॅरीने अर्धशतक झळकावले. त्याने 69 चेंडूत 6 चौकारासह 63 धावांची खेळी साकारली. कॅरी बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्कने स्कॉट बोलंडसोबत डाव सांभाळला आणि संघाला 500 च्या जवळ पोहोचवले. स्टार्कने शानदार खेळी साकारताना अर्धशतक झळकावले. त्याने 141 चेंडूत 13 चौकारासह 77 धावांचे योगदान दिले. शेवटी ब्रेंडन डोगेटने बोलंडसोबत 20 धावा जोडल्या आणि संघाला 511 धावांपर्यंत पोहोचवले. पहिल्या डावात ऑसी संघाला 177 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली. इंग्लंडसाठी ब्रायडन कार्सने सर्वाधिक 4 बळी घेतले. कर्णधार बेन स्टोक्सने 3 तर जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन आणि विल जॅक्स यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.

कांगारु पुन्हा वरचढ

पहिल्या डावात 177 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरु केला. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने 48 धावांची सलामीची भागीदारी केली. डकेटला बोलँडने बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. तो 15 धावा करून बाद झाला. यानंतर ओली पोप आणि क्रॉलीने डाव सारवण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघेही अपयशी ठरले. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना क्रॉलीला 44 धावांवर नेसरने तंबूचा रस्ता दाखवला तर पोप 26 धावा करुन माघारी परतला. जो रुट, हॅरी ब्रूक यांनाही निराशा केली. दोघेही 15 धावा करुन बाद झाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लिश संघाने 35 षटकांत 6 बाद 134 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस कर्णधार बेन स्टोक्स 4 आणि विल जॅक्स 4 धावांवर खेळत होते. इंग्लिश संघ अद्याप 43 धावांनी पिछाडीवर असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, मायकेल नेसर आणि स्कॉट बोलंडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड पहिला डाव 334 आणि दुसरा डाव 3535 षटकांत 6 बाद 134 (जॅकी क्रॉली 44, बेन डकेट 15, ओली पोप 26, जो रुट 15, हॅरी ब्रूक 15, स्टोक्स खेळत आहे 4, विल जॅक्स खेळत आहे 4, मिचेल स्टार्क, नेसर आणि बोलँड प्रत्येकी 2 बळी).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव 511.

स्टार्कचा विक्रमी धमाका

इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चांगलेच अडचणीत आणणाऱ्या मिचेल स्टार्कने फलंदाजीने देखील सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. स्टार्कने 141 चेंडूत 77 धावा केल्या आहेत. या खेळीसह स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 1000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. स्टार्क हा sंऊण् मध्ये 1000 धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा नववा खेळाडू ठरला आहे. तो आता sंऊण् मध्ये 1000 धावा आणि 100 विकेट्स गाठणारा पॅट कमिन्स नंतर दुसराच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. आता या यादीत मिचेल स्टार्कचा देखील समावेश झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात फक्त पाच खेळाडूंनी 1000 धावा आणि 100 विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स, ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क या खेळाडूंचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article