महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड ‘युरो’च्या अंतिम फेरीत, आता स्पेनशी मुकाबला

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘स्टॉपेज टाइम’मध्ये केलेल्या गोलच्या जोरावर नेदरलँड्सवर 2-1 ने मात

Advertisement

वृत्तसंस्था /डॉर्टमंड

Advertisement

इंग्लंडने युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश मिळविलें असून आता विजेतेपदासाठीच्या लढतीत स्पेनशी त्यांची झुंज रंगणार आहे. इंग्लंडचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांनी धाडसी निर्णय घेताना कर्णधार हॅरी केनच्या जागी उतरविलेल्या ऑली वॉटकिन्सने स्टॉपेज टाईमच्या पहिल्याच मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर त्यांनी नेदरलँड्सवर 2-1 असा विजय मिळवला. युरो-2024 मधील उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने स्लोव्हाकियाला पराभूत करण्यापूर्वी ज्यूड बेलिंगहॅमने

स्टॉपेज टाइममध्ये बरोबरीचा गोल केला होता आणि उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडला हरवण्यासाठी त्यांना पेनल्टी शूटआउटची आवश्यकता भासली होती. 1966 च्या विश्वचषकानंतर इंग्लंडचा पुऊष संघ पहिल्या मोठ्या विजेतेपदाच्या जवळ पोहोचलेला असून त्यामुळे इंग्लिश समर्थकांची उत्कंठा पराकोटीची वाढली आहे. यात इंग्लंडचे राजे चार्ल्स तृतीय हे देखील समाविष्ट आहेत.

युरो 2024 मध्ये वॉटकिन्स फक्त एकदाच खेळला होता. डेन्मार्कविऊद्धच्या गटस्तरावरील सामन्यात बदली खेळाडू म्हणून तो झळकला होता. त्यामुळे इंग्लंडच्या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या सामन्यात 80 व्या मिनिटाला साउथगेट यांनी त्याला उतरविले तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. पण हा जुगार यशस्वी ठरला. कोल पाल्मर या अन्य एका बदली खेळाडूने चेंडू पुरविल्यानंतर वॉटकिन्सने गोलक्षेत्राच्या आतून जाळीच्या कोपऱ्यात जोरदार फटका हाणला. वॅटकिन्स हा अॅस्टन व्हिलाचा स्ट्रायकर असून तो प्रीमियर लीगमध्ये गेल्या मोसमात गोल करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर राहिला होता.

त्यापूर्वी 21 वर्षीय शावी सिमन्स हा नेदरलँड्ससाठी युरोमध्ये गोल करणारा दुसरा सर्वांत तऊण खेळाडू ठरल्यानंतर इंग्लंडवरील दबाव वाढला होता. सिमन्सने सात मिनिटांनंतर डचला शानदारपणे आघाडी मिळवून दिली होती. पण इंग्लंडने 11 मिनिटांनंतर हॅरी केनच्या पेनल्टीच्या माध्यमातून बरोबरी साधली. या स्पर्धेत तीन गोल करणारा केन हा सहावा खेळाडू ठरला आहे. बर्लिनमध्ये रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये इंग्लंडचा लॅमिने यामाल आणि उर्वरित स्पेन संघाशी सामना होईल. 1966 मध्ये विश्वचषक जिंकलेल्या आणि युरो, 2020 च्या फायनलमध्ये इटलीकडून पराभूत झालेल्या इंग्लंडचा परदेशी भूमीवरील हा पहिला विजेतेपदासाठीचा सामना आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article