महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड पेनल्टी शूटआऊटमध्ये स्वित्झर्लंडला नमवून उपांत्य फेरीत

06:08 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ डसेलडॉर्फ

Advertisement

पेनल्टी शूटआउटमधील इंग्लंडच्या त्रासदायक इतिहासाला आणखी एक सुखद अध्याय जोडला गेला आहे. युरोपियन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी पेनल्टीवर हरल्यानंतर तीन वर्षांनी इंग्लंडच्या खेळाडूंनी स्वित्झर्लंडला शूटआऊटमध्ये पराभूत करून युरो, 2024 च्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यश मिळविले आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी इंग्लंड आता बुधवारी डॉर्टमंडमध्ये नेदरलँडशी खेळणार आहे.

Advertisement

ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डने विजेत्यासाठी जाळीच्या वरच्या कोपऱ्यात चेंडू फटकावत विजयी गोल केला. अतिरिक्त वेळेत हा सामना 1-1 अशा बरोबरीत राहिल्यानंतर इंग्लंडने सर्व पेनल्टी यशस्वीपणे हाणत शूटआउट 5-3 असा जिंकला.  खरे तर इंग्लंडच्या पहिल्या दोन युरो सामन्यांनंतरअलेक्झांडर-अर्नोल्डला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे आपल्यासाठी स्पर्धा संपली अशीच त्याची धारणा झाली होती.

बुकायो साका, ज्याची पेनल्टी किक 2021 मध्ये निष्फळ ठरली होती आणि त्याबद्दल भरपूर टीका सहन करावी लागली होती, त्यानेही पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल केला. त्याशिवाय अनुक्रमे 22 आणि 21 वर्षीय कोल पामर आणि ज्यूड बेलिंगहॅम तसेच सट्टेबाजीविषयक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आठ महिन्यांची बंदी भोगून जानेवारीमध्ये परतलेला इव्हान टोनी या सर्वांनी शूटआऊटमध्ये गोल केले. गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने स्वित्झर्लंडची पहिली पेनल्टी किक हाणलेल्या मॅन्युएल अकांजीचा प्रयत्न निष्फळ ठरविल्याने शूटआऊटमध्ये इंग्लंड आघाडीवर गेला.

एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कधीही पोहोचू न शकलेला स्वित्झर्लंड तीन वर्षांपूर्वीच्या स्पेनविऊद्धच्या पराभवानंतर युरोपियन चॅम्पियनशिपमधून दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टीवर बाहेर पडला आहे. नियमित वेळेत इंग्लंडचा फॉरवर्ड साका याने 80 व्या मिनिटाला गोलखांब्याला आदळून आलेल्या चेंडूवर गोल करून संघाला बरोबरी साधून दिली आणि सामना अतिरिक्त वेळेत नेला. स्वित्झर्लंडला त्याच्या पाच मिनिट पूर्वी ब्रील एम्बोलोने गोल करून आघाडी मिळवून दिली होती.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article