महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका बरोबरीत

06:08 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिसरा सामना पावसामुळे रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ मँचेस्टर

Advertisement

इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व निर्णायक टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. ओल्ड ट्रॅफोर्डवरील हा सामना एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला.

पावसाचे वातावरण असल्याने थोडा वेळही खेळ होऊ शकणार नाही, असे लक्षात आल्याने पंचांनी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4.20 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या नियोजित वेळेच्या दोन तासानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी जिंकल्यानंतर कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 3 गड्यांनी विजय मिळवित बरोबरी साधली होती. आता या दोन संघांत पाच सामन्यांनी वनडे मालिका होणार असून गुरुवारी त्याची सुरुवात ट्रेंट ब्रिजवर होणार आहे. नियमित कर्णधार जोस बटलर जखमी असल्याने 25 वर्षीय हॅरी ब्रूककडे प्रथमच इंग्लंडचे नेतृत्व देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article