इंग्लंडकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग-11 ची घोषणा
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्थान नाहीच
वृत्तसंस्था/ लंडन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील पहिला सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला. आता 2 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, त्याआधी इंग्लंडने आपली प्लेइंग-11 जाहीर केला आहे. बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इंग्लंडने आपल्या संघात कोणताच बदल केलेला नाही. या सामन्यापूर्वी जोफ्रा आर्चरचा संघामध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु, त्याला अद्याप प्लेइंगमध्ये स्थान मिळवण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर एजबॅस्टनमध्ये भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. अशातच कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तो अचानक संघाबाहेर गेला आहे. ज्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नसल्याची माहिती इंग्लिश बोर्डाने दिली आहे. आर्चरला जवळजवळ 4 वर्षांनी कसोटी संघात स्थान देण्यात आले. दरम्यान, आर्चर गेल्या अनेक वर्षांपासून कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्याने चार वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता त्याला परतण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत.
भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग - 11 : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.