महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड अ महिला संघाची मालिकेत बरोबरी

06:50 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सध्या भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड अ महिला संघाने शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात इंग्लंड अ संघातील इसी वाँगने आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 15 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह जलद 35 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आता या मालिकेत तिसरा आणि शेवटचा सामना 3 डिसेंबरला खेळवला जाईल.

Advertisement

या मालिकेतील पहिला सामना भारतीय महिला संघाने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर शुक्रवारच्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंड अ संघाला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. भारताच्या डावामध्ये पॉवर प्ले दरम्यान यजमान संघाने 2 बाद 54 धावा जमवल्या होत्या. उमा छेत्रीने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा जमवल्या. वृंदा दिनेशने 4 धावा जमवल्या. मनीने 3 चौकारांसह 13 चेंडूत 14 धावा केल्या. पंजाबच्या कनिका अहुजाने 14 चेंडूत 27 धावा जमवताना 5 चौकार ठोकले. दिशा कसाटने 25 चेंडूत 20, दिव्याने 7 धावा केल्या. आरुषी गोयलने 26 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 26 धावा झळकवल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 9 बाद 149 धावा जमवल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंड अ संघाने 18.5 षटकात 6 बाद 151 धावा जमवत हा सामना 4 गड्यांनी जिंकला. या सामन्यात इसी वाँगने 15 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा झोडपल्या. सदर सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. इंग्लंडने शेवटच्या 7 चेंडूत 23 धावा झोडपल्याने त्यांना 12 चेंडूत विजयासाठी 23 धावा जरुरी होती. वाँगने समयोचित फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंड अ संघातील ग्रेस स्क्रिव्हेन्सने 39 धावा जमवताना बाऊचर समवेत पहिल्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. बाऊचरने 3 चौकार  आणि 1 षटकारासह 27 धावा जमवल्या. भारतीय संघाची कर्णधार मिनू मनीने 29 धावात 2 तर श्रेयांका पाटीलने एक गडी बाद केला. इंग्लंड अ संघातील चार्ली डिनने 10, केम्पने 17 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 9 बाद 149, इंग्लंड अ 18.5 षटकात 6 बाद 151.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article