For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंजिनियरिंगचा चमत्कार...3 मजली ब्रिज

06:01 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
इंजिनियरिंगचा चमत्कार   3 मजली ब्रिज
Advertisement

डिझाइन पाहून व्हाल अचंबित

Advertisement

चीन स्वत:च्या अनोख्या निर्मितीकार्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. चीनच्या इंजिनियरिंग कौशल्याचा एक नमुना म्हणजे 3 मजली ब्रिज आहे. हा ब्रिज चीनच्या ताईयुआन शहरानजीक उभारण्यात आला असून तो शांक्सी प्रांतात 1370 मीटर उंच तियानलोंग माउंटेनवर स्थित आहे. ब्रिजचे हवाईदृश्य पर्वतावर घोंगावणाऱ्या विशाल ड्रॅगनप्रमाणे दिसून येते. या ब्रिजचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल ‘ग्रेट इंजिनियरिंग’ असे नमूद करण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत या तीन मजली ब्रिजचे डिझाइन पाहून अचंबित व्हाल. 16 सेकंदांचा हा व्हिडिओ अत्यंत प्रभावी आहे. व्हिडिओत लोक ब्रिजवरून वाहने चालविताना दिसुन येतात. तर काही वाहने ब्रिजवर उभी असल्याचे लोक सेल्फी घेत असल्याचे देखील दिसून येते.

Advertisement

या ब्रिजची उंची 350 मीटर असून तो एका पर्वतावर फैलावलेला आहे. माउंटेनवर वर्तुळाकृती असलेल्या ब्रिजची एकूण लांबी 30 किलोमीटर इतकी आहे. बॉक्स गर्डर असलेल्या या हायवे ब्रिजच्या निर्मितीत 7 हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा तीन मजली ब्रिज  तियानलोंगशान महामार्गावर असून याला ‘ढगांवरील महामार्ग’ या नावाने देखील ओळखले जाते. सध्या हा ब्रिज स्थानिक लोकांसाठी एक हॉटस्पॉट ठरला आहे. येथे येत लोक सेल्फी घेत आहेत. तीनमजली महामार्ग ब्रिज आधुनिक इंजिनियरिंगचा एक चमत्कारच आहे.

Advertisement
Tags :

.