For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात नोव्हेंबरमध्ये 11 अब्ज डॉलर्सची

06:22 AM Dec 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात नोव्हेंबरमध्ये 11 अब्ज डॉलर्सची
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

भारताने नोव्हेंबर महिन्यात पाहता सर्वाधिक अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात केली असल्याचे समोर आले आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांना निर्यात चांगली झाली आहे. गेल्या दोन महिन्यात निर्यातीत घसरण राहिली होती पण नोव्हेंबरमध्ये निर्यातीत 39 टक्के इतकी वाढ झालेली दिसून आली.

डिसेंबर 2024 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये यंदा अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात 23 टक्के वाढली आहे. मागच्या वर्षी 8.90 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. यंदा विक्रमी 11 अब्ज डॉलर्सची अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात झाली आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरमधील निर्यात ही लक्षणीय मानली जात आहे. ऑक्टोबरमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता निर्यात 17 टक्के कमी राहिली होती.

Advertisement

 निर्यात वाढीची संधी

अलीकडेच ओमान, न्यूझीलंड यासारख्या देशांसोबत व्यापार करा झाले असून लवकरच या देशांनाही अभियांत्रिकी वस्तुंची निर्यात केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जागतिक आणि देशांतर्गत स्तरावर व्यापाराच्या बाबतीत सकारात्मक कल दर्शवला जात आहे. निर्यात करण्यात आलेल्या वस्तुंमध्ये पाहता मोटर्स किंवा कार्स, बोटी, औद्योगिक मशिनरी, इलेक्ट्रीक मशिनरी यासारख्यांचा समावेश होता. सध्याला उत्तर अमेरिका व युरोप हे दोन विदेशातले विभाग निर्यातीत आघाडीवर आहेत.

Advertisement
Tags :

.