For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Engineer caught trap in Cyber criminal सायबर चोरट्यांनी अभियंत्याला घातला सव्वादोन लाखांचा गंडा, संगमेश्वर तालुक्यातील घटना

06:31 PM Jun 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
engineer caught trap in cyber criminal  सायबर चोरट्यांनी अभियंत्याला घातला सव्वादोन लाखांचा गंडा  संगमेश्वर तालुक्यातील घटना
Advertisement

संगमेश्वर : तालुक्यातील नावडी येथील अभियंता तरुणाला सायबर चोरट्यांनी तब्बल २ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भामट्याने त्यांच्या बँक खात्यांमधून ऑनलाईन पद्धतीने रक्कम काढून घेतल्याचे उघड झाले आहे.

Advertisement

शशांक प्रकाश सावंत (३५, रा. नावडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांची संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया आणि जनता सहकारी बँक (संगमेश्वर शाखा) येथे खाती आहेत.

सायबर चोरट्याने ३० मे ते १ जून २०२६ या कालावधीत त्यांच्या बँक खात्यांची गोपनीय माहिती मिळवून खात्यांमधून ऑनलाईन व्यवहार केले. यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ९५ हजार रुपये व ८० हजार रुपये, तर जनता सहकारी बँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये, अशी एकूण २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

Advertisement

खात्यातील व्यवहारांची माहिती मिळताच शशांक सावंत यांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ बँक व पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.