दापोली पत्तन कार्यालयात अभियंताकडून उपोषणकर्त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण
दापोली :
26 जानेवारी रोजी उपोषणाला बसल्याचा राग मनात धरून दापोलीतील सहाय्यक पतन अभियंता पत्तन उपविभाग दापोली कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश रमेश जाधव यांनी उपोषणकर्ते मयूर मोहिते यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दापोलीत शुक्रवारी दुपारी घडला आहे. याबाबत मयूर मोहिते यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
मयूर मोहिते हे राकेश जाधव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात 26 जानेवारी रोजी दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्यांच्या दोन दिवस चाललेल्या उपोषणानंतर राकेश जाधव यांची दापोलीतून रत्नागिरी येथे बदली करण्यात आली. दरम्यानच्या काळात राकेश जाधव हे वैद्यकीय रजेवरती गेलेले होते. उपोषण संपल्यानंतर मधुकर मोहिते हे शुक्रवारी सहाय्यपतन अभियंता कार्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी गेले होते. ते कागदपत्रे घेऊन कार्यालयाच्या बाहेर पडत असताना राकेश जाधव अचानक तेथे आले व त्यांनी मधुकर मोहिते यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी राकेश जाधव यांच्या तोंडाला दारूचा वास येत असल्याचे देखील मधुकर मोहिते यांनी पोलीस स्थानकाच्या तक्रारीत नमूद केली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. याचा अधिक्त पास दापोली पोलीस करत आहेत.