कुंभमेळाव्यातला 'इंजिनिअर बाबा' ही झाला व्हायरल
प्रयागराज
गंगा नदीच्या तीरावर शाही स्नानासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकांच्या समुदात इंजिनिअर बाबाने सर्वांचे विशेष आकर्षण बनला आहे. या इंजिनिअर बाबाची कहाणी प्रचंड व्हायरल होत आहे. इंजिनिअर बाबा रुदाक्ष आणि राखेने माखलेल्या कपाळ घेऊन एका टिव्ही चॅनेलला मुलाखत दिली. त्यानंतर तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. इथेच त्याला इंजिनिअर बाबा असे नाव मिळाले.
'इंजिनिअर बाबा' ने सांगितले, की तो चार वर्षे मुंबईत राहिला. त्यानंतर त्यांने फोटोग्राफी आणि कलांकडे लक्ष केंद्रित केले. 'इंजिनिअर बाबा' म्हणजे अभय सिंग याला कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरीची ऑफर मिळाली. त्याचा खरा मार्ग दुसरीकडेच आहे हे लक्षात येण्यापूर्वी त्यांने काही काळ काम केले. त्याने छाया चित्रणात प्रवेश करण्यापूर्वी एक वर्ष विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र शिकवले. कालांतराने त्यांची आवड अध्यात्माकडे वळली आणि त्यांनी त्यांचे जीवन सखोल आध्यात्मिक ध्येये समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी समर्पित केले आहे.
अभय सिंग याने महाकुंभ मेळाव्यातील भाविकांना त्यांच्या अनोख्या दृष्टिकोनाने, वैज्ञानिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाचे मिश्रण करून मोहित केले आहे. आकृत्या आणि दृश्य सादरीकरणांचा वापर करून, जटिल आध्यात्मिक संकल्पना सोप्या करून लोकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न या मेळाव्यात करत आहे.