महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

12:48 PM Jun 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रवाशांचा दीड तास खोळंबा : इतर गाड्यांवरही परिणाम

Advertisement

रत्नागिरी /प्रतिनिधी
मुंबईवरून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सावर्डे ते आरवली दरम्यान बिघाड निर्माण झाल्यामुळे येथील रेल्वे वाहतूक दीड तास खोळंबली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रत्नागिरी येथून दुसरे इंजिन मागवण्यात आले होते. या इंजिन बिघाडाचा दिवा- सावंतवाडी, मंगला एक्स्प्रेस, उधना -मंगळूर या तीन रेल्वे गाड्यांवर परिणाम होऊन त्यांना थांबा देण्यात आला आहे. दरम्यान जनशताब्दी एक्सप्रेस बंद पडून दीड तास उलटला वाहतूक सुरळीत न झाल्याने प्रवाशांकडून तिव्र नाराजी व्यक्त होत होती.

Advertisement

Advertisement
Tags :
# railway # sindhudurg# janshtabdhi express # tarun bharat news#
Next Article