जयपूर-चंदीगड विमानात ‘इंजिन फेल’मुळे घबराट
दोन्ही इंजिन निकामी : पायलटने हुशारीने विमान सुरक्षितपणे उतरवले
वृत्तसंस्था/ जयपूर
जयपूर विमानतळावरून चंदीगडला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या हवाई फेरीदरम्यान मोठा अपघात टळल्याने विमानातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले. उ•ाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानात घबराट पसरली. उ•ाणानंतर काही वेळाने विमानाच्या एका इंजिनमध्ये अचानक समस्या निर्माण झाली. पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळातच दुसरे इंजिन देखील बंद पडले. तथापि, वैमानिकाने हुशारी दाखवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सुरक्षितपणे उतरवले. विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
ही घटना इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6ई-7742 मध्ये घडली. हे विमान जयपूरहून चंदीगडला होते. जयपूर विमानतळावरून सकाळी 5:50 वाजता विमानाने उ•ाण केले. ते सकाळी 7:00 वाजता चंदीगडला पोहोचणार होते. पण तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएची तांत्रिक टीम लवकरच विमानाची तपासणी करणार आहे. या घटनेबाबत विमान कंपन्यांकडून एक अहवालही तयार केला जात आहे.