सोनारिका भदौरियाची एंगेजमेंट
प्रियकर विकास पराशरसोबत नात्यात
अभिनेत्री सोनारिका भदौरियाने प्रियकरासोबत एंगेजमेंट केली आहे. या एंगेजमेंटची छायाचित्रे तिने शेअर केल्यावर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनारिका स्वतःच्या आयुष्याबद्दल अत्यंत सतर्क राहिली आहे. तिने कधीच स्वतःच्या नातेसंबंधांचा जाहीर उल्लेख केला नव्हता.
सोनारिकाने विकास पराशरसोबत एंगेजमेंट केली आहे. विकासने सोनारिकाला समुद्र किनाऱयावर डायमंड रिंगसोबत प्रपोज केले. यावेळी दोघेही पांढऱया रंगाच्या पोशाखात होते. सोनारिकाने विकासला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एंगेजमेंटची छायाचित्रे शेअर केली आहेत.
विकाससोबतच्या सोनारिकाच्या अफेयरची चर्चा 2020 पासून सुरू झाली होती. तेव्हा विकासने एका पोस्टमध्ये सोनारिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘आय लव्ह यू’ असे लिहिले होते. परंतु सोनारिकाने डेटिंगचे वृत्त कायमच फेटाळले होते आणि विकास केवळ चांगला मित्र असल्याची भूमिका मांडली होती.