कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Energy Drinks Drawbacks : एनर्जी ड्रिंक्सचा वापर आणि दुप्षपरिणाम, पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

12:59 PM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहान वयातीलमुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर गंभीर दुष्परिणाम होतोय

Advertisement

By : डॉ. सचिन पाटील, हृदयरोग तज्ज्ञ, कोल्हापूर

Advertisement

कोल्हापूर : एनर्जी ड्रिंक्सचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. ‘झटपट उर्जा’ देण्याचे दावे आणि सहज उपलब्धता हे याचे कारण आहे. एनर्जी ड्रिंक्समधीलकॅफिन, साखर आणि इतर रासायनिक घटकांचे प्रमाण मुलांच्या शारीरिक, बौद्धिक वाढीवर गंभीर दुष्परिणाम करत आहे. यासंदर्भात जागरूकता, नियमनाची तातडीने गरज आहे.

वेगवान जीवनशैलीत एनर्जी ड्रिंक्सचे तरूण, मुलांमध्ये आकर्षण वाढले आहे. आकर्षक जाहिराती, ‘झटपट ऊर्जा’ देण्याचे दावे आणि सहज उपलब्धता हे याचे एक प्रमुख कारण आहे. या एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिन, साखर आणि इतर रासायनिक घटकांचे प्रमाण लहान वयातील मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर गंभीर दुष्परिणाम करत आहे.

त्यामुळे हार्मोन्स, एकूण आरोग्य आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यादृष्टीने जागरूकता आणि नियमनाची तातडीने गरज आहे. सरकार, पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्रितपणे काम करून मुलांना यापासून वाचवण्यासाठी पावले उचलावीत. एनर्जी ड्रिंक्सच्या ऐवजी नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब केल्यास मुलांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित राहील.

एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय?

एनर्जी ड्रिंक्स ही अशी पेये आहेत, जी तात्पुरती ऊर्जा, सतर्कता आणि कार्यक्षमता वाढवण्याचा दावा करतात. यामध्ये कॅफिन, टॉरिन, ग्वाराना, ग्लुकोरोनोलॅक्टोन, साखर आणि कृत्रिम स्वीटनर्स यासारखे घटक असतात. सामान्यत: 250 मिलिलिटरच्या एका कॅनमध्ये 80 ते 300 मिलीग्रॅम कॅफिन असते, जे एका कॉफीच्या कपापेक्षा (साधारण 95 मिली ग्रॅम) जास्त आहेयाशिवाय, यामध्ये बी-व्हिटॅमिन्स, कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स यांचाही समावेश असतो.

एनर्जी ड्रिंक्सचे दुष्परिणाम

1. शारीरिक वाढीवर परिणाम

हार्मोन्समध्ये असंतुलन : एनर्जी ड्रिंक्समधील उच्च कॅफिन आणि टॉरिन यांचा परिणाम मुलांच्या अंत:स्रावी प्रणालीवर होतो. त्यामुळे थायरॉईड, अॅड्रेनल आणि पिट्यूटरी ग्रंथींच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. ज्यामुळे वाढीचे हार्मोन्स आणि लैंगिक हार्मोन्स यांचे संतुलन बिघडते.

हाडांचा विकास : कॅफिनमुळे कॅल्शियम शोषण कमी होते, ज्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये हाडांचा विकास मंदावतो. त्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.

हृदयावर परिणाम : उच्च कॅफिनमुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. लहान वयातील मुलांच्या हृदयावर याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

पचनसंस्थेचे विकार : साखर आणि कृत्रिम स्वीटनर्समुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि आतड्यांचे विकार उद्भवू शकतात. दीर्घकाळ सेवन केल्यास ड्रिंकमध्ये असलेल्या केमिकलमुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढू शकते.

2. बौद्धिक वाढीवर परिणाम

मेंदूचा विकास : किशोरवयात मेंदूचा विकास महत्त्वाचा असतो. कॅफिन आणि टॉरिन यांचा अतिवापर मेंदूच्या न्यूरॉन्सवर परिणाम करतो, ज्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

झोपेचे विकार : एनर्जी ड्रिंक्समुळे झोपेचे चक्र बिघडते, ज्यामुळे मुलांची मानसिक स्थिरता आणि बौद्धिक कार्यक्षमता कमी होते. अपुरी झोप मेंदूच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम करते. चिंता आणि तणाव : कॅफिनमुळे चिंता, बेचैनी आणि तणाव वाढतो. लहान वयातील मुलांमध्ये त्यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या, डिप्रेशन उद्भवू शकतात.

3. आरोग्यावर परिणाम

लठ्ठपणा आणि मधुमेह : एनर्जी ड्रिंक्समधील उच्च साखर आणि कॅलरीमुळे लठ्ठपणा आणि टाइप-टू मधुमेहाचा धोका वाढतो. लहान वयात याची सवय लागल्यास भविष्यात हृदयविकार आणि इतर चयापचय विकारांचा धोका वाढतो.

किडनीवर ताण : कॅफिन आणि रासायनिक घटकांमुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे दीर्घकालीन वापराने किडनीचे विकार उद्भवू शकतात.

दातांचे नुकसान : साखर आणि आम्लिय पदार्थांमुळे दातांची झीज आणि हिरड्यांचे आजार वाढतात. व्यायाम, शारीरिक

हालचालींवर परिणाम : एनर्जी ड्रिंक्समुळे तात्पुरती ऊर्जा मिळते, परंतु त्यानंतर थकवा आणि अशक्तपणा येतो, ज्यामुळे खेळ आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम होतो.

4. व्यसनाचा धोका

कॅफिन आणि साखरेचे नियमित सेवन लहान वयात व्यसनाला कारणीभूत ठरते. त्यामुळे मुलांना एनर्जी ड्रिंक्सशिवाय कार्यक्षम राहणे कठीण जाते, ज्यामुळे त्यांचे शारीरिक, मानसिक अवलंबित्व वाढते.

वैज्ञानिक अभ्यास आणि तथ्ये

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’च्या अहवालानुसार लहान वयातील मुलांनी एनर्जी ड्रिंक्स टाळावीत, कारण त्यामधील कॅफिन आणि इतर उत्तेजक पदार्थ मुलांच्या विकासावर नकारात्मक परिणाम करतात.‘डब्ल्युएचओ’च्या अहवालानुसार उच्च साखरेच्या पेयांमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

जर्नल ऑफ न्यूट्रिशन’च्या अभ्यासात असे दिसून आले की, किशोरवयीन मुलांमध्ये कॅफिनच्या अतिवापरामुळे झोपेचे विकार आणि मानसिक तणाव वाढतो.

लहान वयात एनर्जी ड्रिंक्सचा वाढता वापर

जाहिरातींचा प्रभाव : एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिराती खेळ, साहस आणि यश यांच्याशी जोडल्या जातात. ज्यामुळे लहान मुले त्याकडे आकर्षित होतात.

सहज उपलब्धता : हे पेय दुकानांमध्ये, जिममध्ये आणि ऑनलाईन सहज उपलब्ध आहेत, ज्यामुळे मुलांना ते खरेदी करणे सोपे जाते.

सामाजिक दबाव : मित्रमंडळी आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे किशोरवयीन मुले ही पेये ‘कूल’ समजून वापरतात.

अभ्यास आणि स्पर्धा : परीक्षा आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे लहान वयातील मुले रात्री जागरण आणि सतर्कतेसाठी एनर्जी ड्रिंक्सकडे वळतात.

प्रतिबंध आणि उपाय

पालक, शिक्षक आणि मुलांना एनर्जी ट्रिक्सच्या दुष्परिणामांबाचत जागरूक करावे. शाळांमध्ये याबाबत कार्यशाळा आयोजित कराव्यात, एनजी ड्रिंक्सच्या विक्रीवर वय आधारित निर्बंध घालावेत, कफिन आणि साखरेच्या प्रमाणावर मर्यादा घालावी आणि उत्पादनांवर चेतावणी लेबल लावावे, मुलांना एनर्जी ड्रिक्सऐवजी पाणी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस आणि हर्बल टी यासारखे नैसर्गिक पेय यावे.

संतुलित आहार आणि नियमित व्यायाम बांद्वारे नैसर्गिक ऊर्जा वाढवावी. पालकांनी मुलांच्या पेय सेवनावर लक्ष ठेवावे, त्यांना कफिनव्या धोक्यांबाचत समजावून सांगारे, मुलांना पुरेशी झोप आणि सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करावे.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#parents#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaenergy drink drawbacksenergy drinksheart specialistschool children
Next Article