For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एंडोच्या निवृत्तीने जपानला धक्का

07:34 AM Jun 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
एंडोच्या निवृत्तीने जपानला धक्का
Advertisement

वृत्तसंस्था, टोकीयो

Advertisement

जपान फुटबॉल संघाचा कर्णधार वातारु एंडोला दुखापत झाल्याने त्याला सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या 2026 च्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला मुकावे लागत आहे. मात्र त्याने या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतल्याने जपानला फार मोठा अनपेक्षित धक्का बसला आहे.

या स्पर्धेत जपानचा सलामीचा सामना नेदरलँड्सबरोबर 15 जून रोजी  होत आहे. या स्पर्धेसाठी जपान फुटबॉल संघटनेने एंडोकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविली होती. एंडोच्या पायाच्या तळव्याला ही दुखापत झाली असून तो अद्याप या दुखापतीतून सावरलेला नाही. सदर दुखापत बरी होण्यासाठी बराच कालावधी लागेल तसेच या दुखापतीवर शस्त्रक्रिया करवून घेण्याची जरुरी असल्याचे जपान फुटबॉल संघाचे संचालक यामामोटो यांनी सांगितले. 33 वर्षीय एंडो हा प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत लिव्हरपूल क्लबकडून खेळत आहे. आतापर्यंत त्याने 73 आंतरराष्ट्रीय सामन्यात जपानचे प्रतिनिधित्व केले आहे.

Advertisement

शुक्रवारचे निकाल

मेक्सिको वि.वि. दक्षिण आफ्रिका 2-0

दक्षिण कोरिया वि.वि. झेक प्रजासत्ताक 2-1

रविवारचे सामने

1) कतार वि. स्वित्झर्लंड

वेळ : शनिवारी मध्यरात्री 12.30

2) ब्राझील वि. मोरोक्को

वेळ : शनिवारी उत्तररात्री 3.30

3) स्कॉटलंड वि. हैती

वेळ : सकाळी 6.30

4) ऑस्ट्रेलिया वि. तुर्की

वेळ : सकाळी 9.30

5) जर्मनी वि. कुरासाओ

वेळ : सकाळी 10.30.

Advertisement
Tags :

.