For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जॅकब एलोर्डीसोबत रिलेशनशिपमध्ये केंडल

06:57 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
जॅकब एलोर्डीसोबत रिलेशनशिपमध्ये केंडल
Advertisement

अभिनेता जॅकब एलोर्डी आणि केंडल जेनर पुन्हा एकदा एकत्र पाहिले गेले आहेत. यामुळे त्यांच्या डेटिंगविषयीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. दोघेही लॉस एंजिलिसमध्ये काइली जेनर आणि टिमोथी चालमेटसोबत एकाच कारमध्ये दिसून आले.  जॅकब आणि केंडल यांच्या डेटिंगविषयी दीर्घकाळापासून चर्चा रंगत आहेत. छायाचित्रांमध्ये जॅकब हा कार चालवत होता, तर केंडल पुढील सीटवर त्याच्या शेजारी बसली होती. तर काइली अन् टिमोथी हे अन्य एका मित्रासोबत मागील सीटवर बसले होते.

Advertisement

काही काळापूर्वी दोघेही एकत्र हॉलिडे साजरा करताना दिसून आले हेते. यांना बीचवर वेळ घालवताना आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये डिनरचा आनंद घेताना पाहण्यात आले होते. जॅकब आणि केंडल हे दोघेही परस्परांच्या सोबतीचा आनंद घेत आहेत. जस्टिन बीबरकडून आयोजित एका आफ्टर पार्टीतही दोघांमधील जवळीक दिसून आली होती. जॅकब यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिला आहे. ओलिविया जेड जियानुल्ली, काइया गेर्बर, जेंडाया आणि जॉय किंग यांचा यात समावेश आहे. तर केंडिल ही यापूर्वी डेविन बुकर आणि बेन सीमन्ससोबत नात्यात राहिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.