कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लांजातील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवली

10:42 AM Jul 04, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लांजा :

Advertisement

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरात रस्त्याच्याकडेला असणारी अतिक्रमणे गुऊवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग विभागाने नगर पंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुऊवात केली. यावेळी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अतिक्रमण काढण्यासाठी सुऊवात करताच साहित्य काढून घेण्यासाठी संबंधित नागरिकांची धावपळ उडाली. दिवसभरात 12 दुकाने हटविण्यात आली.

Advertisement

नगर पंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील अतिक्रमणे 3 जुलैपर्यंत हटवावीत अन्यथा पोलीस बंदोबस्तात ती हटवण्यात येतील. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गुऊवारी 3 जुलै रोजी अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात कारवाई सुरू केली.

कारवाईची सुरूवात तहसीलदार कार्यालयासमोरील परिसरात केलेल्या अतिक्रमणांपासून करण्यात आली. त्या ठिकाणी असणारे टपऱ्या, दुकानाचे फलक हटवण्यात आले. कारवाई सुरू होताच आजूबाजूच्या परिसरातील दुकानांचे साहित्य काढून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. कारवाई करताना व्यावसायिकांच्या डोळ्dयांदेखत शेड काढून टाकण्यात आल्याने त्यांना मात्र अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुतर्फा असलेली रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने या अतिक्रमण हटाव मोहिमेस पुरेसा पोलीस बंदोबस्त घेतला होता. त्यामुळे अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकांचा फारसा विरोध झाला नाही. मोहीम सुरू असताना पोलीस कर्मचारी व दंगल नियंत्रक पथक तैनात होते. यावेळी साधारणत: दंगल नियंत्रण पथकाचे 30 जवान तसेच लांजा, राजापूर आणि देवरुख येथील 30 पोलीस कर्मचारी मिळून सुमारे 60 पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कारवाईच्या धसक्याने अतिक्रमणे काढून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. पथक काही अंतरावर असतानाच अतिक्रमणे काढून घेतली जात होती. त्यामुळे या पथकाचेही काम सोपे झाले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे वाहतुकीस होणारा अडथळा काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. एक टपरी हटवण्यासाठी 8 ते 10 माणसे झटत होती. ही मोहीम पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर संबंधित फेरीवाले, व्यापारी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांची भेट घेत त्यांना घेराव घातला. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक संजय यादव, उबाठा सेनेचे पदाधिकारी तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश राणे उपस्थित होते. यावेळी गणपती सणापर्यंत आम्हांला मुदत वाढवून द्या, असे सांगण्यात आले. तसेच उड्डाणपुलाच्या खाली बसणारे व्यापारी यांच्यावर तूर्तास कारवाई करू नका, असे सांगण्यात आले. परंतु उपअभियंता यांनी कारवाईला मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगत पुलाखालील व्यापाऱ्यासंदर्भात वरिष्ठांशी बोलून कळवतो, असे उपस्थितांना सांगितले.

या कारवाईवेळी उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग आर. पी. कुलकर्णी, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड, लांजा निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजये, ठेकेदार कंपनी ईगल इन्फ्राचे साईट सुपरवायझर नरेश सितलानी यांच्यासह लांजा नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article