कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'सार्वजनिक बांधकाम' ची अतिक्रमण हटाव मोहीम

11:06 AM Jul 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा :

Advertisement

सातारा-कोरेगाव रस्त्यालगत सैनिक स्कूलचे एक गेट आहे. त्या गेटला लागूनच अनेकांनी आपल्या टपऱ्या, फ्रुट गाडे, चायनिज गाडे टाकले होते. त्याबाबत सैनिक स्कूल प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष रोकडे यांनी सूचना देताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक मंगळवारी अॅक्शन मोडवर कारवाई करताना दिसले. कारवाईमध्ये जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या उचलून जप्त केल्या.

Advertisement

साताऱ्यात जिल्हा परिषद मैदान ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक या दरम्यानच्या फुटपाथवर आणि रस्त्याच्याकडेला मोकळ्या जागेत अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. अगदी जिल्हा परिषदेच्या मैदानालगत फुटपाथवर टपरी टाकण्याचे धाडस दाखवले आहे. जिल्हा परिषदेच्यासमोर तर छोटे मार्केटच भरवले जात होते. अगदी तेथे चप्पलपासून सर्व प्रकारची फळे, पुस्तके, भाजीपाला विकत भेटत होता. तसेच जिल्हा परिषद चौक ते पिरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत काही चायनिज गाडे, फळांचे गाडे व इतर टपऱ्या मोठ्या प्रमाणावर सुरु होत्या. त्यामुळे रात्रीसुद्धा या परिसरात चायनिज दरबारमध्ये गर्दी होत असायची, त्याचे राहिलेले शिळे पदार्थ, कचरा पडल्याने कुत्र्याचा त्रास परिसरात वाढत होता. त्यातच सैनिक स्कूल प्रशासनाकडून ही समोरची अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मंगळवारी कारवाई करण्यात आली. कारवाई वेळी विशेष कोणीही टपरीधारक तेथे नव्हते. कारवाई ही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

या कारवाईमुळे शहरातील हॉकर्स संघटनेचे काही पदाधिकारी, काही स्थानिक नेत्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नेमकी कारवाई आणखी कुठपर्यंत केली जाणार आहे, याची माहिती घेण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article