For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : गांधीनगर येथे अतिक्रमण आणि नालेसफाईवरुन घमासान!

05:30 PM May 02, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   गांधीनगर येथे अतिक्रमण आणि नालेसफाईवरुन घमासान
Advertisement
गांधीनगर येथील ब्ल्यू लाईनमधील बांधकामावर कारवाई
कोल्हापूर : गांधीनगर येथील ब्ल्यू लाईनमधील बांधकामावर कारवाई करा, अशी मागणी करत पूर्वी नोटीसा दिल्यात, आता नोटीसा देण्याची काय गरज आहे, असा प्रश्न इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास यांनी केला. यावर गांधीनगरचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्याच्या सूचना दिल्याचे सभापती शिराळे यांनी सांगितले.
तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील मनपा हद्दीतील बांधकामांना नोटीसा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याचा मसुदा अंतिम केला आहे. येथे सर्वे करुन २०४ बांधकामे निश्चित झाली आहेत. यामध्ये 'जैसे थे' स्थिती असताना २०१८ ची ७७ बांधकामे आहेत. ११ नवीन बांधकामे झाली आहेत. ब्ल्यू लाईनमधील ३७ तर आरक्षित जागेमधील १७ बांधकामे आहेत. ब्ल्यू लाईनमधील बांधकामांना ७ दिवस मुदत देऊन तो भाग रिकामा करण्याच्या नोटीसा दिल्याचे सांगण्यात आले.
Advertisement

पूर्वा राणे यांनी डिजीटल होर्डिंग्जबाबत नोटीस किती काढल्या, याची माहिती मिळावी, अशी मागणी केली. यावर होर्डिंग्जबाबत नवीन धोरण ठरवण्यात येत आहे. लवकरच प्रस्ताव महासभेस सादर करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पथदिव्यांचे एलईडी बंद असल्याने कंपनी काम करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असे सभापतींसह सर्व सदस्यांनी मागणीकरताच ईएसएसएल कंपनीला करार रद्द करण्याबाबत नोटीस दिली आहे. काम बंद असल्याने त्यांची बिले थांबवली आहेत, नवीन कंपनीशी लवकरच करार होऊन कामकाज सुरु होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.