For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिक्रमणधारकांना सोमवारची डेडलाईन

05:13 PM Mar 08, 2025 IST | Radhika Patil
अतिक्रमणधारकांना सोमवारची डेडलाईन
Advertisement

सातारा : 

Advertisement

गुरुवार परज येथे पालिकेचे शॉपिंग कॉम्पलेक्स आहे. त्या कॉम्पलेक्सला लागून अतिक्रमण झालेले आहे. काही हातगाड्या बंद अवस्थेत उभ्या आहेत. तर काही मोकळया गाड्या लागलेल्या आहेत. त्या सर्व अतिक्रमण केलेल्यांना सोमवारपर्यंत स्वत:हून अतिक्रमणे काढून घेण्यात यावीत, अन्यथा सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील अशा सूचना ऑन दी स्पॉट अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने जावून शुक्रवारी दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारी खरोखरच पालिका अतिक्रमण हटावची कारवाई राबवणार की गुरुवार परजावरील स्थानिक नेत्यांचा फोन महाराजांना जाणार आणि मध्येच कारवाई थांबणार हे पहावे लागणार आहे.

सातारा शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. त्यापैकी गुरुवार परज येथील पालिकेच्या शॉपिंग कॉम्लेक्सच्या लगतच काही हातगाड्या व बंद अवस्थेत अशा गाडया आहेत. त्यामुळे वाहतूकीला अडथळा होत आहे. रहदारीला अडचण येत आहे. त्याबाबतच्या तक्रारी सातारा पालिकेकडे झाल्या आहेत. त्यानुसार पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रशांत निकम हे शुक्रवारी दुपारी गुरुवार परज येथे पथकासह पोहचले. त्यांनी तेथील अतिक्रमण धारकांना तोंडी सुचना दिल्या आहेत. सोमवारच्या आत ज्यांची ज्यांची अतिक्रमणे आहेत ती स्वत:हून काढून घ्यावीत, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे. त्यानुसार पालिकेच्या पथकाने दिलेल्या इशाऱ्यानंतर सोमवारी येथे कारवाई करणार की सोमवारपर्यंत इथल्या स्थानिक नेत्यांचा फोन महाराजांना जावून महाराजांच्याकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होवून ही मोहिमच थांबवली जाणार हे सोमवारीच पहायला मिळणार आहे. दरम्यान, पालिकेने सोमवारी मोहिम राबवण्यासाठी सातारा पोलीस दलाकडे पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरले आहेत. त्यामुळे सोमवारी ही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

  • निकम कोणाचेच ऐकत नसल्याने त्यांच्याबाबत नाराजी

अतिक्रमण हटावचे प्रमुख प्रशांत निकम हे फक्त मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनेनुसार कारवाई करतात. त्यांच्यावर इतर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकत नसल्याने सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि अतिक्रमण धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Advertisement
Tags :

.