महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-चोर्ला-गोवा मार्गावरील झुडुपे हटविण्यास चालना

10:18 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांकडून रस्त्याची पाहणी : ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

Advertisement

दै. ‘तरुण भारत’च्या दि. 6 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्याच्या बाजूची झुडुपे त्वरित हटवा, या वृत्ताची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक 748) सहाय्यक कार्यकारी अभियंता जयराम यांनी शुक्रवार दि. 28 रोजी पाहणी केली. त्यानुसार जांबोटी ते चोर्ला रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे हटविण्याच्या कामाला चालना दिली. ‘तरुण भारत’मधून दि. 6 जून रोजी बेळगाव-चोर्ला रस्त्याच्या बाजूची झुडुपे त्वरित हटवा, या मथळ्dयाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक 748) सहाय्यक कार्यकारी अभियंता जयराम यांनी अखेर सदर वृत्ताची दखल घेऊन शुक्रवारी पाहणी केली.बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यापैकी जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडुपांमुळे अपघात होत असल्याने तसेच वाहनधारकांना रस्ता धोकादायक बनल्याने त्याची पाहणी करावी व झुडुपे त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी कणकुंबी-चोर्ला भागातील नागरिक, प्रवासी वर्ग व वाहनधारकांनी केली होती.

धोकादायक वळणे

या मार्गावरील कुसमळी मलप्रभा नदीपासून ते चोर्ला गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा झुडुपे वाढलेली असून काही ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणापर्यंत येऊ लागली आहेत. तसेच धोकादायक वळणावर तरी समोरून येणारे वाहनदेखील दिसत नाही. त्यामुळे या मार्गावर दररोज एखादा दुसरा अपघात घडत आहे.

झुडुपांमुळे अपघाताच्या घटना

यापूर्वी कणकुंबी वनखात्याकडून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे हटविण्यात येत होती. परंतु गेल्या दोन वर्षापासून झुडुपे हटविण्यात आलेली नाहीत. उलट रस्त्याच्या विकासकामात आडकाठी घालण्याचे काम केले जात आहे. रस्त्यावर आलेल्या झुडुपांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने कणकुंबी भागातील नागरिकांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रतिष्ठानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता जयराम यांना बेळगाव-चोर्ला रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार अभियंता जयराम यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी किरण गावडे यांनी धोकादायक वळणावर तसेच ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे रस्त्यावर आल्याने अपघात होत असून झुडुपे त्वरित हटविण्यात यावीत, अशी प्रवासी वर्ग, वाहनधारक व नागरिकांची मागणी असल्याचे सांगितले.

झुडुपे तोडण्यास वनखात्याकडून हिरवा कंदील

यावेळी अभियंता जयराम यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात झुडुपे हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून आपण खानापूरच्या सहाय्यक वन संरक्षण अधिकारी सुनिता निंबरगी यांना कल्पना दिलेली आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी देखील हिरवा कंदील दिलेला असून झुडुपे तोडण्यास आमची हरकत नाही, असे सांगितले आहे. तेंव्हा येत्या दोन दिवसांत रस्त्याच्याकडेला असलेल्या झुडुपे तोडण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article