For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन द्या!

12:41 PM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन द्या
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : ओपा येथे जागतिक पर्यटन दिन उत्साहात

Advertisement

फोंडा : राज्यात पर्यटनासाठी केवळ सूर्यदर्शन, वाळू आणि समुद्रकिनाऱ्यापुरते मर्यादीत न राहता नवयुवकांनी, उद्योजकांनी अंतर्गत म्हणजे ‘हिंटरलॅन्ड’ पर्यटनाला प्रोत्साहन देण्याहेतू स्पाईस फार्म व साहसी जलक्रीडा पर्यटन, आरोग्य व धार्मिक पर्यटनावर भर द्यावा. गोवा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना पर्यटनाला चालना मिळणे अंत्यत गरजेचे असून निसर्गसंपन्न गोव्यात पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहनासाठी स्थानिकांना सामावून घेतले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त केले. ओपा खांडेपार येथील दीपक गावकर यांच्या ‘नंदनवन’ फार्म येथील पर्यटन दिनाच्या सोहळयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले गोव्याच्या पर्यटनक्षेत्राच्या कक्षा रूंदावण्यासाठी उद्योजक, व्यवसायिक, नवयुवकांनी पुढाकार घ्यावा. सरकारच्या विविध योजनांच्या साहाय्याने उद्योजक बनून पर्यटकांना सुविधा पुरवा. पर्यटकांना वृक्षरोपणांच्या अनुभवाबरोबरच समृद्ध नैसर्गिक सौदर्याची अनुभुती देणारी पर्यटनस्थळे दाखवा. स्थानिकांना रोजगार पुरवून गोवा स्वयंपूर्ण बनवा. नंदनवन येथील आदरतिथ्यासाठी स्थानिकांना रोजगार मिळत असल्याचे पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भारावून गेले. दुधसागर पर्यटनही आता योग्य दिशेने वाटचाल करीत असून गोव्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उचललेले ते यशस्वी पाऊल असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत शेवटी म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.