महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये चकमक

06:31 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 सुरक्षा दलांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा : साथीदारांच्या शोधासाठी दिवसभर मोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisement

जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी पुन्हा एकदा तुंबळ चकमक झडली. सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तेथे आणखी अनेक दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेवेळी सतत गोळीबार सुरू होता. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून अनेक गुप्त कागदपत्रे, शस्त्रे आणि बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

सोपोरच्या रफियाबादमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याकडून देण्यात आली. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना घेरण्यासाठी सोपोर पोलीस आणि 32 राष्ट्रीय रायफल्सचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दहशतवादी अजूनही लपून बसले असावेत. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याची ओळख पटवण्यात पोलीस व्यग्र आहेत.

काश्मीरमध्ये यापूर्वी शुक्रवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते. लष्कराने पीओकेचा रहिवासी आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटाचा सूत्रधार जहीर हुसेन शाह याला अटक केली होती. सुरक्षा दलांनी त्याला पुंछमध्ये पकडले होते. काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आतापर्यंत निमलष्करी दलाच्या सुमारे 300 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. या कंपन्या श्रीनगर, हंदवाडा, गंदरबल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियान, पुलवामा, अवंतीपोरा आणि कुलगाम येथे तैनात करण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीमुळे सतर्कता

काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेसाठी मतदान होत असून पहिला टप्पा 18 सप्टेंबरला, दुसरा टप्पा 25 सप्टेंबरला आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा 1 ऑक्टोबरला होणार आहे. तर निवडणुकीची मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. काश्मीर खोऱ्यात विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, सहस्त्र सीमा बल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांसह निमलष्करी दलाच्या 298 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article