For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तस्करी’मध्ये इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत

06:22 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘तस्करी’मध्ये इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत
Advertisement

इम्रान हाशमी पुन्हा एकदा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसून येणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘तस्करी’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून यात तो कस्टम अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. क्राइम थ्रिलर ‘तस्करी’चे दिग्दर्शन राघव जयराथ याने पेले आहे. प्रत्येक सूटकेसमध्ये कुठले ना कुठले रहस्य दडलेले असू शकते, येथे प्रत्येक प्रवासी संशयित असतो अशा जगताची ही कहाणी आहे. अर्जुन मीणा (इम्रान) यात कस्टम ऑफिसर असून तो विमानतळावर तस्करी रोखणाऱ्या टीमचे नेतृत्व करतो. परंतु त्याच्या टीमसाठी स्मगलर पकडणे सोपे नाही.

Advertisement

इम्रानचा हा चित्रपट 14 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार आहे. या चित्रपटात इम्रानसोबत शरद केळकर, जोया अफरोज, नंदिश संधू, अमृता खानविलकर आणि अनुराग सिन्हासमवेत अनेक कलाकार दिसून येतील.

इम्रानचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल. याचबरोबर तो ‘जी2’ या तेलगू चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात अदिवि शेषसोबत वामिका गब्बी आणि मधू शालिनी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.