For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुणांना रोजगार, मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट

11:34 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
तरुणांना रोजगार  मतदारसंघाचा विकास हेच उद्दिष्ट
Advertisement

उमेदवार मृणाल हेब्बाळकर : येळ्ळूर, धामणे येथे प्रचार

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे हे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे बेळगाव लोकसभा काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या येळ्ळूर आणि धामणे येथे निवडणुकीचा प्रचार करून कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. येत्या 7 मे रोजी लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपण स्पर्धा करत आहोत. या निवडणुकीत हाताच्या चिन्हावर बटण दाबून बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे उमेदवार शेट्टर यांना मतदारांनी नाकारले आहे. मतदार व मतदारसंघाशी कोणतीच बांधिलकी नसणाऱ्या उमेदवाराला मतदारांकडून नापसंती दर्शविण्यात आली आहे. स्थानिक उमेदवार म्हणून आपणाला सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन मृणाल हेब्बाळकर यांनी केले.

यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मृणाल हेब्बाळकर गेल्या 10 वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मतदारसंघातील समस्यांची चांगलीच जाणीव असून त्यामुळे विकास साधणे शक्य होणार आहे. बाहेरून येणाऱ्या उमेदवारांकडून येथील विकास होणे अशक्य आहे. समस्यांची जाणीव नसल्याने काय विकास साधणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपला थोडक्याच मतांनी पराभव झाला आहे. आपल्या मुलाला पक्षाकडून संधी देण्यात आली असून मतदारांनी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन मंत्री हेब्बाळकर यांनी केले. यावेळी युवराज कदम, प्रदीप एम. जे., परशराम ढगे, यल्लाप्पा गोरल, किरण पाटील, रुक्मिणी नायक, चांगदेव मजुमदार, रमेश कुंडेकर, सुधीर लोहार, राघवेंद्र सुतार, प्रशांत नंद्याळकर, कृष्णा बाळेकुंद्री, राजू बाळेकुंद्री, एम. के. पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.