For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Municipal Council | सातारा नगरपरिषदेत दुपारनंतर शुकशुकाट! जेवणाची सुट्टी संपली तरी खुर्च्या रिकाम्याच; नागरिक तासन्तास ताटकळत

04:58 PM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
satara municipal council   सातारा नगरपरिषदेत दुपारनंतर शुकशुकाट  जेवणाची सुट्टी संपली तरी खुर्च्या रिकाम्याच  नागरिक तासन्तास ताटकळत
Advertisement

सातारा - सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात दुपारच्या जेवणाच्या वेळेनंतर अनेक विभागांमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र समोर आले असून त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. कार्यालयाची अधिकृत वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी असताना दुपारच्या जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या एका तासाच्या सुट्टीनंतरही अनेक कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

Advertisement

दुपारी दीड ते अडीच या वेळेत जेवणाची सुट्टी असते. मात्र प्रत्यक्षात दुपारी तीन वाजले तरी अनेक विभागातील टेबल रिकामेच दिसतात. काही नागरिकांनी तर कर्मचारी जेवणासाठी घरी जाऊन चार वाजेपर्यंत परत येत असल्याचा आरोप केला आहे. परिणामी नागरिकांची कामे केवळ सकाळी दहा ते दीड या वेळेतच होत असल्याची भावना नागरिकांमध्ये झाली आहे.

विविध कार्यालयातील विभागांच्या पाहणीत अनेक ठिकाणी खुर्ष्या रिकाम्या, टेबलांबर फायलींचे ढीग आणि कर्मचारी मात्र अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन प्रतीक्षा करावी लागत आहे. काही विभागांमध्ये तर दुपारनंतरचे बाताबरण कोबिड काळातील ओस पडलेल्या कार्यालयांची आठवण करून देणारे वाटत होते.

Advertisement

पंखे-लाईट सुरू, कर्मचारी गायब

या प्रकारातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनेक विभागांमध्ये कर्मचारी नसतानाही पंखे, लाईट आणि अन्य विद्युत उपकरणे सुरूच असल्याचे दिसून आले. ऊर्जा बचतीच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या कार्यालयातच विजेचा असा अनाठायी बापर होतअसल्याने करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी थकीत बीज बिलामुळे महावितरणकडून नगरपरिषदेचा बीज पुरवठा खंडित करण्याची वेळ आलीहोती. अशा परिस्थितीत कार्यालय रिकामे असताना पंखे व दिवे सुरू ठेवण्यामागील निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे याला रोख लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.