कर्मचारी आत्महत्या : गुन्हे दाखल करा
मिरज :
सांगली पाटबंधारे मंडळ कार्यालयातील कर्मचारी महेश मुकुंदराव कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणी पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी जबाबदार असल्याचा आंबेडकरी समाजाने केला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ.महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिसात तक्रारीचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सांगली पाटबंधारे मंडळ सांगली कार्यालयातील शिपाई महेश मुकुंदराव कांबळे यांना त्यांच्याच विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास दिला. त्यामुळेच कांबळे यांनी आत्महत्या केली, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय काही जबाबदार अधिकाऱ्यांची नांवेही या निवेदनात नमुद आहेत. सदर प्रकरणाची सखोल चौकशी कऊन दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विलास सर्जे, राकेश कुरणे, नितीन माने, अमेय कोलप, आबा हेगडे उपस्थित होते.