कामगाराकडूनच दुकानात अडीच लाखांची चोरी
रत्नागिरी :
तालुक्यातील पाली बाजारपेठ येथील देशी दारुच्या दुकानात कामगाराने अडीच लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 2 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडल़ी अशोक धोंडू तारी (ऱा चुनाभट्टी, सायन, मुंबई) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्यावर दुकानातील रोख रक्कम आणि दारुच्या बाटल्या असा एकूण 2 लाख 53 हजार 500 रुपयांचा माल चोरुन नेल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े
याप्रकरणी विनोद शांताराम रसाळ (45, रा. पाली बाजारपेठ) यांनी चोरीची तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित अशोक तारी याने 2 एप्रिल रोजी दिवसभर देशी दाऊची विक्री करून आलेले 21 हजार ऊपये आणि दुकानातील 180 मिलीच्या 1,226 नग संत्रा देशी दारुच्या सीलबंद बाटल्या (किंमत 98 हजार 80 ऊपये), 90 मिलीच्या 1,440 नग सीलबंद बाटल्या (किंमत 57 हजार 600 रुपये) तसेच 750 मिलीच्या 12 नग बाटल्या (किंमत 3 हजार 840 रुपये) असा एकूण 1 लाख 59 हजार 520 रुपयांची दारु चोरल़ी तसेच संशयिताने जानेवारी 2025 ते मार्च 2025 या दरम्यान विक्री केलेल्या देशी दारुची 72 हजार 980 ऊपये इतकी रक्कमही स्वत:च्या फायद्यासाठी चोरुन नेल्याचा आरोप ठेवण्यात आला आह़े याप्रकरणी पोलिसांनी अशोक तारी याच्याविऊद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 306 नुसार गुन्हा दाखल केल़ा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आह़े