For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करा

11:06 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करा
Advertisement

अतिथी प्राध्यापकांचे विधानसौध परिसरात आंदोलन : कायम न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा

Advertisement

बेळगाव : राज्यातील 430 शासकीय प्रथमश्रेणी महाविद्यालयांपैकी बहुतांशी महाविद्यालयांमध्ये अतिथी प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. या अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करावे, अशी मागणी राज्य सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालय अतिथी प्राध्यापक संघातर्फे कोंडुसकोप येथील आंदोलनस्थळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गेल्या कित्येक वषर्पांसून अतिथी शिक्षक कमी वेतनावर सेवा बजावू लागले आहेत. त्यामुळे दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात शिक्षकांना कायमस्वरुपी न केल्यास सेवेवर बहिष्कार टाकून बेमुदत आंदोलन छेडले जाणार आहे, असा इशारादेखील आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी दिला आहे. सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनी विरोधी बाकावर असताना समस्या समजून घेतल्या होत्या आणि सोडविण्याबाबत आश्वासनही दिले होते. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर अतिथी प्राध्यापकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. शिवाय निवडणुकीदरम्यान काँग्रेस सरकारने आपल्या जाहीरनाम्यात अतिथी शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप याकडे दुर्लक्ष झाले आहे. अधिवेशनात अतिथी शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करून शैक्षणिक वर्षापासून अतिथी शिक्षकांना सेवेत कायमस्वरुपी करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.