For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतात दिमाखात स्वागत

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतात दिमाखात स्वागत
Advertisement

प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी : जयपूरमध्ये रोड शो मध्ये सहभाग

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली, जयपूर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आपल्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याचा एक भाग म्हणून गुरुवारी थेट जयपूरला पोहोचले. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल कलराज मिश्र यांनी त्यांचे स्वागत केले. मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाच्या परेडला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन राजस्थानातील जयपूर येथील आमेर किल्ल्यावर पोहोचले. याप्रसंगी त्यांनी तेथे स्वागतासाठी जमलेल्या शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली.  तसेच त्यांनी जयपूर येथील आमेर किल्ल्यावर राजस्थानी चित्रकलेचे आणि सांस्कृतिक ठेव्याचे कौतुक करत कलाकारांशी संवाद साधला. याप्रसंगी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारीही उपस्थित होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मॅक्रॉन यांनी रोड शो केला. त्यांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण पिंक सिटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पोस्टर्सनी सजवण्यात आली होती.

Advertisement

रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय बैठक

जंतरमंतर आणि हवा महलला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स  राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत ताज रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची ही भेट भारत-फ्रान्स धोरणात्मक भागिदारीच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या उत्सवावर आधारित आहे.

Advertisement
Tags :

.