एमिली इन पॅरिस सीझन 5 लवकरच
यावेळी पॅरिस नव्हे रोमला जाणार एमिली
लोकप्रिय रोमँटिक कॉमेडी सीरिज स्वत:च्या पाचव्या सीझनसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमान्स, फॅशन आणि ड्रामाने भरपूर असल्याचे आश्वासन देणाऱ्या एमिली इन पॅरिस सीरिजचा नवा चॅप्टर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार आहे. तर लिली कॉलिन्सने साकारलेली भूमिका एमिली कूपर यावेळी पॅरिस सोडून एका नव्या रोमांचासाठी इटलीच्या रोम शहरात जाणार असल्याचे समजते. ही सीरिज सांस्कृतिक मतभेद, प्रोफेशनल महत्त्वाकांक्षा, रोमान्स आणि सोशल मीडियाचा प्रभाव यासारख्या विषयांवर आधारित आहे. एमिली इन पॅरिस सीझन 5चा प्रीमियर अत्यंत लवकरच ओटीटीवर होणार आहे. सीरिज नेटफ्लिक्सवर 18 डिसेंबरपासून पाहता येणार आहे. शिकागोत राहणारी अमेरिकन महिला एमिली या व्यक्तिरेखेवर ही सीरिज आधारित असून उत्तम नोकरीची संधी मिळाल्यावर ती पॅरिस येथे जाण्याचा निर्णय घेते. या सीरिजमध्ये लिली कॉलिनस, फिलिपिनलेरॉय-ब्यूलियू, एलशी पार्क, कॅमिला रजात, लुकास ब्रावो, सॅम्युअल अर्नोल्ड, ब्रूनो गौरी आणि लुसिएन लॅविस्काउंट समवेत अनेक कलाकार सामील आहेत.