7 जानेवारीला ‘इमरजेंसी’
अभिनेत्री कंगना रनौतचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘इमरजेंसी’चा नवा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. हा चित्रपट 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला यापूर्वी सेंसर बोर्डाकडून सर्टिफिकेशन मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगनाने स्वत:च्या अभिनयाद्वारे चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर कंगना आणि तिच्या चित्रपटाचे कौतुक होत आहे. ट्रेलरची सुरुवात जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणाऱ्या अनुपम खेर यांच्या दृश्याने होते.
जयप्रकाश नारायण हे तत्कालीन पंतप्रधानांना एक पत्र लिहित असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. तर चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका कंगनाने साकारली असून ‘मैं ही पॅबिनेट हूं’ असा संवाद म्हणताना ट्रेलरमध्ये दिसून येते. मिलिंद सोमणने या चित्रपटात सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटात श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, महिमा चौधरी हे कलाकारही दिसून येतील. चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनानेच केले आहे. या चित्रपटाकडून कंगनाला मोठ्या अपेक्षा आहेत.