धमकीमुळे छत्तीसगडमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था/रायपूर
भारतातील विमानांना बॉम्बच्या धमकीचे सत्र थांबताना दिसत नाही. अशाच धमकीमुळे इंडिगोच्या एका विमानाचे छत्तीसगडमधील रायपूर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब सापडला नाही. चौकशीनंतर सदर तऊणाची आता तुऊंगात रवानगी करण्यात आली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये गुऊवारी इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
नागपूर ते कोलकाता या फ्लाईटमधून प्रवास करणाऱ्या एका तऊणाने क्रू मेंबरला फोन करून बॉम्ब असल्याची माहिती दिल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. तसेच सुरक्षा उपाय तातडीने लागू करण्यात आले. बॉम्बची माहिती मिळताच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या तपासणीदरम्यान रायपूर विमानतळावरील सेवा काही काळ प्रभावित झाली होती. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर 187 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना तातडीने विमानतळावर उतरवण्यात आले, असे रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले.