महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मलेशियन विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /हैदराबाद

Advertisement

तेलंगणाहून मलेशियाला जाणाऱ्या विमानाचे गुऊवारी तेलंगणातील राजीव गांधी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला माघारी परतावे लागले. हैदराबादहून मलेशियातील क्वालालंपूर येथे जाणाऱ्या एमएच 199 या विमानाने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मध्यरात्री 12.15 वाजता उ•ाण केले. त्यानंतर मलेशियन एअरलाईन्सच्या या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास येताच अर्ध्या तासानंतर 12:45 वाजता विमान लँड करण्यात आले. याप्रसंगी विमानात 138 प्रवासी होते. विमान सुखरुपपणे परतल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विमानातील तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर सर्व प्रवासी पुन्हा आपल्या प्रवासावर निघाले. प्रवाशांना झालेल्या विलंबाबाबत विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article