For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममध्ये महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग सुविधा

06:27 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
आसाममध्ये महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग सुविधा
Advertisement

चीनसोबतचा तणाव पाहता प्रकल्प निर्मिती : लढाऊ विमाने उतरविता येणार 

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममध्ये राष्ट्रीय महामार्ग-127 वर इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी (ईएलएफ) 31 जुलैपर्यंत पूर्णपणे तयार होणार आहे. याचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. चारपदरी महामार्गावर अशाप्रकारची सुविधा ईशान्येत भारताच्या सामरिक शक्तीत अनेक पटीने वाढ करणारी आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक असल्याने चीन नेहमीच येथे भारतासाठी मोठा धोका राहिला आहे. परंतु आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्याच्या मोरनमध्ये एक नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गावर निर्माण करण्यात आलेली इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी भारतीय वायुदल तसेच सैन्याच्या सामर्थ्यात या पार्श्वभूमीवर भर टाकणार आहे.

Advertisement

आसामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 127 नगावंनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 27 पासून सुरू होत समागुरीला जोडत अखेर जाखलाबंधापर्यंत राष्ट्रीय महामार्ग-715 पर्यंत पोहोचणार आहे. या चारपदरी महामार्गामुळे आसामच्या लोकांना मोठा लाभ मिळणार आहे, तसेच हा महामार्ग भारतीय सशस्त्र दलांसाठी मैलाचा दगड ठरू शकतो. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी या महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली आहे. आगामी काळात हे क्षेत्र रणनीतिक स्वरुपात किती महत्त्वपूर्ण ठरणार याचे संकेत मिळू लागले आहेत.

ऑक्टोबरपासून सुरू होणार सुविधा

नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शर्मा यांनी माहिती दिली. यानुसार महामार्ग प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झाले असून 31 जुलैपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे तयार होणार आहे. 4.2 किलोमीटर लांब हा महामार्ग ऑक्टोबरपासून पूर्णपणे कार्यान्वित होईल. या महामार्गाला नागरिकांच्या गरजांसोबत सैन्य आवश्यकतांसाठी देखील इमर्जन्सी लँडिंग सुविधा उपलब्ध करविता येईल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे.

महामार्गावर उतरणार लढाऊ विमाने

आसामच्या मोरनमध्ये जी इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी (ईएलएफ) निर्माण करण्यात आली असून ती अत्याधुनिक लढाऊ विमान उतरण्यायोग्य अन् उ•ाण करू शकतील अशाप्रकारे डिझाइन करण्यात आली आहे. येथे गरज भासल्यास राफेल, तेजस आणि सुखोई-30 यासारख्या लढाऊ विमानांसोबत सशस्त्र सैन्याचे सी-130 हर्क्यूलिस आणि एंटोनोव एएन-32 यासारखी विशाल विमानेही उतरू शकणार आहेत. आपत्कालीन स्थितीत महामार्गावरील वाहनांची वाहतूक रोखून याचा तत्काळ धावपट्टीच्या स्वरुपात वापर केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.