ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे बाबली गवंडे यांचे इमर्जन्सी रक्तदान !
ओटवणे | प्रतिनिधी
ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या निरवडे-कोनापाल येथील विष्णू जाधव या पेशंटला ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स ऑन कॉल संस्थेने पुरविल्या होत्या. मात्र त्यांना इमर्जन्सी रक्ताची गरज असताना संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ ओरोस येथे जाऊन रक्तदान केले.याबाबत ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रक्ताच्या गरजेची माहिती संस्थेच्या समूहावर पाठविली. परंतु वादळ, वारा, पाऊस सुरु असल्याने अजून रक्तदाते मिळण्यासाठी व मिळाले तर ते रक्तपेढीपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी स्वतःच जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन इमर्जन्सी रक्तदान केले. बाबली गवंडे संस्थेचे यांनी खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांना घेऊन ओरोसला जात व येत असताना वारा, पाऊस असतानाही आपले आतापर्यंतचे १७ वे रक्तदान केले. ही पोस्ट पूर्ण होण्यासाठी संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी नियोजन केले. तातडीची गरज असताना तात्काळ येऊन रक्तदान केल्याबद्दल रक्तदाते बाबली गवंडे यांच्यासहीत ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नातेवाईकांनी आभार मानले आहेत.