For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमामी हेलियॉसमधील उर्वरीत हिस्सेदारी खरेदी करणार

06:06 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
इमामी हेलियॉसमधील उर्वरीत हिस्सेदारी खरेदी करणार
Advertisement

चेन्नई :

Advertisement

रोजच्या वापराच्या वस्तूंची निर्मिती करणारी देशातील एफएमसीजी कंपनी इमामीने हेलियॉस लाईफस्टाईलमध्ये उर्वरित 49 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलियॉस ही पुरुषांकरीताच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या द मॅन कंपनीची मूळ कंपनी आहे. इमामीने याआधी हेलीयॉस लाइफस्टाइलमधील 50.4 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी केलेली आहे. कंपनी उर्वरित 49.6 टक्के हिस्सेदारी हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इमामीने यापूर्वी दोन टप्प्यांमध्ये हेलियॉसमध्ये आपली हिस्सेदारी मजबूत केली होती.

कधीपासून हिस्सेदारीत वाढ

Advertisement

सुरुवातीला 33.09टक्के इतकी हिस्सेदारी कंपनीने प्राप्त केली होती. नंतर 2017 मध्ये आणि दुसऱ्यांदा फेब्रुवारी 2019 मध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यात आली. 2022 मध्ये कंपनीने आपल्या हिस्सेदारीमध्ये वाढ करत ती 50.4 टक्केपर्यंत नेली. सुगंधआधारीत परफ्युम, फ्रॅग्रान्स उत्पादने, त्वचेची देखभाल, केसांची देखभाल, शरीराची देखभाल राखणारी उत्पादने त्याचप्रमाणे सौंदर्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे.

Advertisement
Tags :

.