For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतवंशीय प्रेयसीशी एलॉन मस्कचा ब्रेकअप

06:25 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतवंशीय प्रेयसीशी एलॉन मस्कचा ब्रेकअप
Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी त्यांच्या भारतीय वंशाच्या प्रेयसीसोबत संबंध तोडले आहेत. न्यूरालिंकच्या कार्यकारी अधिकारी शिवॉन गिलिस यांनी मस्कसोबतच्या संबंध तुटल्याची पुष्टी केली. शिवॉन गिलिस आणि इलॉन मस्क यांना चार मुले आहेत. यामध्ये स्ट्रायडर आणि अझूर ही जुळी मुले, आर्केडिया ही मुलगी आणि सेल्डन लायकर्गस हा मुलगा यांचा समावेश आहे. मस्कने 2021 मध्ये जुळ्या मुलांच्या जन्माची घोषणा केली होती. आर्केडियाचा जन्म 2024 मध्ये झाला. त्यानंतर गिलिसने 28 फेब्रुवारी 2025 रोजी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्या चौथ्या मुलाच्या, सेल्डन लायकर्गसच्या जन्माची घोषणा केली.

शिवॉन गिलिस हिने शनिवारी ‘एक्स’वर पोस्ट करत मस्कने आठवडाभरापूर्वी ‘आय लव्ह यू’ म्हटले होते, पण त्याने अचानक संबंध तोडल्याचे स्पष्ट केले. आपल्याला याबद्दल कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. आता नाते तुटल्याने मला दु:ख झाले आहे, पण माझ्या मनात मस्कबद्दल अजूनही खूप आपुलकी आहे. तो कायम आनंदी राहावा अशी माझी इच्छा आहे. आपण दोघे चांगले मित्र राहू आणि आपल्या मुलांचे संगोपन एकत्र करू, असेही शिवॉनने पुढे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.