For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एलॉन मस्क यांची जपानमध्ये मोठी झेप

06:22 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
एलॉन मस्क यांची जपानमध्ये मोठी झेप
Advertisement

टेस्ला मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत  : सर्व्हिस सेंटर्सची संख्या दुप्पट करणार : एक्सवर माहिती देत मस्क यांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिग्गज अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क हे जपानच्या ऑटो बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. टेस्ला आता जपानमधील आपले सर्व्हिस सेंटर आणि सुपरचार्जर नेटवर्क दुप्पट करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत.

Advertisement

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकतीच जपानमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. मस्क यांनी ‘एक्स“ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, कंपनी जपानमधील आपल्या सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर आणि सुपरचार्जर नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहे. जगातील सर्वात प्रगत ऑटोमोटिव्ह बाजारांपैकी एक असलेल्या या बाजारात आपले स्थान मजबूत करणे आणि वाढती मागणी पूर्ण करणे, हा यामागील उद्देश आहे.

सर्व्हिस सेंटर्सची संख्या दुप्पट

निक्केई एशियाच्या अहवालानुसार, टेस्ला यावर्षी जपानमधील आपल्या सर्व्हिस सेंटर्सची संख्या 14 वरून 30 पेक्षा जास्त करण्याची योजना आखत आहे. आपली पोहोच वाढवण्यासाठी कंपनी जुन्या मालमत्ता आणि इमारतींचा वापर करणार आहे, ज्यांचा वापर पूर्वी मेंटेनन्स शॉप म्हणून केला जात होता. यामुळे कमी खर्चात नेटवर्कचा अधिक वेगाने विस्तार करणे शक्य होईल. याव्यतिरिक्त, ज्या भागांमध्ये टेस्लाची स्वत:ची केंद्रे नाहीत, तिथे कंपनी 50 हून अधिक ठिकाणी सेवा देण्यासाठी स्थानिक ऑटो केअर केंद्रांसोबत भागीदारी करणार आहे.

जपान व टेस्ला यांच्यातील घनिष्ठ संबंध

मस्क यांनी गुंतवणुकी- सोबतच जपानसोबतच्या टेस्लाच्या दीर्घकालीन संबंधांवरही भर दिला. ते म्हणाले की, टेस्लाच्या गाड्यांमध्ये वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे भाग जपानमध्ये बनवले जातात. विशेषत:, पॅनासोनिक गेल्या 20 वर्षांपासून टेस्लाचा सर्वात मोठा धोरणात्मक पुरवठादार आहे. मस्क म्हणाले की, जपान केवळ एक बाजारपेठ नाही, तर टेस्लाच्या पुरवठा साखळीचा एक अत्यावश्यक भाग आहे.

Advertisement
Tags :

.