For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगातील सर्वात मोठे रॉकेट प्रक्षेपण संकुल बांधणार एलॉन मस्क

06:46 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
जगातील सर्वात मोठे रॉकेट प्रक्षेपण संकुल बांधणार एलॉन मस्क
Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

Advertisement

स्पेसेक्स कंपनीचे सर्वेसर्वा अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क हे जगातील सर्वात मोठे रॉकेट प्रक्षेपण संकुल उभारणार असल्याची माहिती आहे. या प्रकल्पासाठी कंपनी 9.50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. हा प्रकल्प अमेरिकेतील दक्षिण लुइसियाना येथे होण्याची शक्यता आहे. येथे फक्त रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे, निर्मिती होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेत 3 हजार जणांना रोजगार मिळू शकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लुइसियानातील पिकान आयलँडवर 1.25 लाख एकर विस्तारीत जागेवर प्रक्षेपण संकुल उभारायची तयारी केली जात आहे. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन शहराच्या आकाराच्या जवळपास आठपट मोठी सदरची जागा असल्याचे बोलले जाते. येथून स्पेसेक्सचे नेक्स्ट जनरेशन रॉकेट स्टारशिप व एआय आधारीत उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या कामाची सुरुवात 2029 पासून होणार आहे. या प्रकल्पातून जवळपास 3 हजार जणांना रोजगार प्राप्त होणार असून निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक 88 लाख रुपये इतके वेतन मिळणार आहे.

Advertisement

अनेक सुविधा

सदरच्या नव्या प्रक्षेपण संकुलात रॉकेट प्रोपेलेंटसाठीच्या मिथेन गॅसचे उत्पादन होणार असून तेथेच विजेचे उत्पादन घेतले जाणार आहे. रॉकेट आणण्यासाठी व नेण्यासाठी बंदर स्थापले जाणार आहे. तसेच एक समर्पित विमानतळाची उभारणीही तेथे असणार असल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.