‘टेस्ला’च्या सीईओ पदावर अॅलन मस्क यांची मोहर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश एलॉन मस्क यांनी सांगितले की, ते पुढील पाच वर्षे टेस्लाचे सीईओ राहण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. टेस्लाचा कारभार सांभाळणारे मस्क हे अलीकडे प्रशासनाच्या कामात अधिक लक्ष घालत असल्याने टेस्लाच्या ग्राहक व समभागधारकांकडून त्यांच्यावर दबाव येत असल्याचे समजते. ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या कतार इकॉनॉमिक फोरममध्ये मस्कने व्हिडिओद्वारे भाग घेतला तेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला. ट्रम्पच्या मध्य पूर्व दौऱ्यादरम्यान मस्क यांनी अलीकडेच दोहाला भेट दिली. या काळात स्पेसएक्स आणि स्टारलिंकचे प्रमुख मस्क यांनी अतिशय कमी शब्दात उत्तरे दिली आणि त्यांच्या व्यवसाय आणि राजकारणाशी संबंधित प्रश्नांवर ते थोडे रागावलेले दिसले. एका मुलाखतीदरम्यान, मस्क यांना विचारले की, ते पुढील पाच वर्षांसाठी स्वत:ला टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाहतात का आणि ते त्यासाठी वचनबद्ध आहेत का. यावर मस्कने सरळ उत्तर दिले-‘हो’. प्रश्नकर्त्याने पुन्हा विचारले की काही शंका आहे का, तेव्हा मस्क हसले आणि म्हणाले, ‘जर मी मेलो नाही तर मी इथे असेन.’
अलीकडेच, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ या प्रयत्नात सामील झाल्यापासून त्यांच्यावर खूप दबाव आला आहे. या काळात अमेरिकेच्या संघराज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येत होती, ज्याचा टेस्लावरही परिणाम झाला. जेव्हा मस्क यांना विचारण्यात आले की या सर्व गोष्टींमुळे त्यांना राजकारणात येण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागला का, तेव्हा क्षणभर थांबून कॅमेऱ्यापासून त्यांनी दूर पाहिले. थोड्या वेळाने त्यांनी उत्तर दिले. मस्क यांना टेस्लाकडून पगार पॅकेज मिळणार होते, ज्याची किंमत एकेकाळी 56 अब्ज डॉलर होती. परंतु डेलावेअरमधील एका न्यायाधीशाने तो करार रोखला. मस्क यांनी मंगळवारी त्या न्यायाधीश, चांसलर कॅथलीन सेंट ज्यूड मॅककॉर्मिक यांच्यावर हॅलोविन पोशाखात न्यायाधीश म्हणून काम करणारी कार्यकर्ता अशी टीका केली. याचदरम्यान मस्क यांनी हे देखील मान्य केले की, टेस्लाचा पगार करार हा कंपनीत राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचा एक भाग होता, त्यावर जास्त बोलू इच्छित नाही.