इलेसी पेरीचा नवा विक्रम
वृत्तसंस्था / अॅडलेड
ऑस्ट्रेलियाची 35 वर्षीय महिला अष्टपैलु क्रिकेटपटू इलेसी पेरीने क्रिकेटच्या क्षेत्रात एक नवा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियातर्फे क्रिकेटच्या सर्व प्रकारात इलेसी पेरीने 350 सामने खेळण्याचा हा पराक्रम केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 17 धावांनी पराभव करत मालिका विजय संपादन केला. उभय संघात तब्बल दशकानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ही द्विपक्षीय टी-20 मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमित जिंकण्याचा पराक्रम केला आहे. इलेसी पेरीने आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिलांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत भारताच्या कर्णधार हरमनप्रित कोर पहिल्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत 357 सामने खेळले असून न्यूझीलंडची सुझी बेट्स 355 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आता या यादीत इलेसी पेरी तिसऱ्या स्थानावर राहील.