For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली कॅप्टिल्सचा सलग दुसरा विजय

06:56 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली कॅप्टिल्सचा सलग दुसरा विजय
Advertisement

मुंबई इंडियन्सचा 6 गड्यांनी पराभव, सामनावीर रिझवीचे अर्धशतक : हार्दीक पंड्याची संघाला उणीव

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बावीस वर्षीयू समीन रिझवीचे दमदार अर्धशतक तसेच अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅप्टिल्सने शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 11 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी पराभव केला. 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅप्टिल्सने आपला सलग दुसरा विजय नोंदवित आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. मात्र मुंबई इंडियन्सला या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या विजयानंतर पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement

दिल्ली कॅप्टिल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मुंबईने 20 षटकांत 6 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्लीने 18.1 षटकांत 4 बाद 164 धावा जमवित विजय नोंदविला.

रिक्लेटन आणि रोहीत शर्मा यांनी सलामीच्या गड्यासाठी 15 चेंडूत 18 धावा जमविल्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेशकुमारने मुंबईला पहिला धक्का देताना रिक्लेटनला मिडऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अक्षर पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 2 चौकारांसह 9 धावा जमविल्या. त्यानंतर मुकेशकुमारने याच षटकातील पाचव्या चेंडूवर तिलक वर्माला शानदार टिपले. रोहीत शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागिदारी केली. रोहीत शर्माने 26 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 35 धावा जमविल्या. अक्षर पटेलने रोहीतला राणाकरवी झेलबाद केले. यानंतर मुंबईच्या मध्यफळीतील खेळाडूंना दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर फटकेबाजी करता आली नाही. निगमने रुदरफोर्डला 5 धावांवर बाद केले.

 

कर्णधार यादव आणि नमनधीर यांनी पाचव्या गड्यासाठी 37 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव 36 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 51 धावा जमविल्या. एन्गिडीने त्याला 16 व्या षटकात पायचीत केले. नमनधीरने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 58 धावा जमविल्या. सँटेनरने 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 18 आणि बॉश्चने 4 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 11 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 41 धावा जमविताना 2 गडी गमविले. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. दिल्लीतर्फे मुकेशकुमारने 26 धावांत 2 तर एन्गिडी, अक्षर पटेल, निगम आणि नटराजन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मुंबईच्या दीपक चहरने के.एल राहुलला केवळ 1 धावेवर झेलबाद केले. त्यानंतर दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर बुमराहने चोरटी धाव घेणाऱ्या नितीश राणाला खाते उघडण्यापूर्वीच धावचित केले. दिल्लीची स्थिती यावेळी 2 बाद 7 अशी होती.

समीर रिझवी आणि निशांका या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 49 चेंडूत 66 धावांची भागिदारी केली. निशांकाने 30 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 44 धावा जमविल्या. सँटेनरने निशांकाला झेलबाद केले. समीर रिझवीला डेविड मिलरने चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. संघाला विजयासाठी केवळ 11 धावांची जरुरी असताना तसेच शतकासमीप पोहोचलेला रिझवी उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. बॉश्चच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने त्याचा सीमारेषेवर झेल घेतला. रिझवीने 51 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह 90 धावा झोडपल्या. मिलर आणि स्टब्ज यांनी विजयाचे सोपस्कर पूर्ण केरले. मिलरने 18 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 21 तर स्टब्जने नाबाद 3 धावा जमविल्या. दिल्लीच्या डावात 8 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅप्टिल्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 42 धावा जमविताना 2 गडी गमविले. रिझवीने 31 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात दिल्ली कॅप्टिल्सने समीर रिझवीला बदली इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आणि त्याने या संधीचा पुरेपर फायदा उठविला. मुंबईतर्फे दीपक चहर, सँटेनर आणि बॉश्च यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :

.